December 1, 2025 5:46 am

‘मलखांब व रोप मलखांब’ स्पर्धेत बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालय द्वितीय

आंतर महाविद्यालयीन मलखांब व रोप मलखांब स्पर्धेत,

बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालयास द्वितीय पारितोषिक

काटा वृत्तसेवा I कळमेश्वर :  अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी, येथे दिनांक 22 सप्टेंबर 2024 ला आंतर महाविद्यालयीन मलखांब व रोप मलखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये नागपूर विद्यापीठा अंतर्गत अनेक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.
                        या स्पर्धेत बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयाच्या मुलींच्या चमुनी मलखांब व रोप मलखांब या खेळात सहभाग घेऊन उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली व द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

                        सहभागी विद्यार्थ्यांमध्ये काजल कळंबे, महेश शेख, योगिता कावडकर, तेजस्विनी भक्ते, आकांश हाडोळे, शिवानी न्याहारे, रवीना कुथे, सोबत महाविद्यालयाच्या प्रा. अनिता गणोरकर उपस्थित होत्या. अत्यंत चुरशीच्या सामन्यात मुलींच्या चमुनी द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका थोडगे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन व स्वागत केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News