सावनेर: बुद्धगया येथील महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या नियंत्रणात देण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १२ मार्च रोजी सावनेरच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.४) पंचशील बुद्धविहारात भन्ते शिलरक्षित महाथेरो यांच्या अध्यक्षतेत बैठक पार पडली.
या बैठकीत विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांचे नेते आणि बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. यावेळी, मोर्चाचे नियोजन ठरवण्यात आले. भदन्त शिलरक्षित महाथेरो यांच्या नेतृत्वात १२ मार्च रोजी सावनेर येथील बसस्थानकाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १२ वाजता मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन देण्यात येणार आहे. महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाचा मोर्चा