♦ भाजपने मतदार यादीत घोळ करून इलेक्शन जिंकले, मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
अहमदाबाद : भाजपने मतदार यादीत घोळ करून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी केला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या. पण त्यानंतर भाजपने मतदार यादीत फेरफार करून तब्बल 50 लाख मतदार वाढवले. त्यानंतर भाजपच्या विधानसभा निवडणुकीत 150 पैकी 138 जागा निवडून आल्या. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 50 लाख मतदान वाढले. आत्ता तुम्हीच सांगा, ही कशी लोकशाही? हा कसा निवडणूक आयोग? ही कोणती मतदार यादी या लोकांनी तयार केली? सर्वकाही बोगस तयार करून हे जिंकले.
गुजरातच्या अहमदाबाद येथे काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू झाले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी या अधिवेशनाला उपस्थित नेत्यांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपरोक्त आरोप केला. ते म्हणाले, केंद्र सरकार स्वतःला फायदा व विरोधी पक्षांना नुकसान व्हावे या दृष्टिकोनातून तंत्रज्ञान तयार करत आहे. पण आज नाही तर उद्या या देशातील तरुण जागे होऊन तुमचा हात पकडून आम्हाला ईव्हीएम नव्हे तर बॅलेट पेपरवर मतदान हवे असल्याचे ठणकावून सांगतील.
![]()