महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

राजोली येथे रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यानी रक्तदानाचे कर्तव्य बजावले

भुषण सवाईकर
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, शाखा कुही च्या वतीने राजोली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजोली येथील दिनेश रकतसिंगे यांचे निवासस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळ व्दारा आयोजीत रक्तदान शिबिरात ३५ रक्तदात्यानी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान”आहे.  तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने, जवळपास सर्वच् दवाखान्यांमधून अपघातग्रस्तांना, तसेच अन्य कॅंसरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासते. ज्याची पुर्तता अश्या शिबीरांमधून रक्तसंकलन करून केली जाते. रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजनासाठी डागा शासकीय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी प्रविण भुतकर, डाॅ. शुभांगी चव्हाण, डाॅ.अंकिता श्रेया, वैद्यकीय अधिकारी यांनी आयोजकांची प्रशंसा केली.
प्रस्तूत शिबिरात रक्तसंकलनाचे कार्य डागा शासकीय रक्तपेढीच्या डाॅ. शुभांगी चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, डाॅ.अंकिता श्रेया, वैद्यकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी प्रविण भुतकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोहित जयस्वाल, व प्रचिती वाळके, हरीश चरडे अधिपरीचारक, वासुदेव निकोसे कक्ष सेवक यांनी सांभाळले. तसेच रक्तसंकलनाचे कार्य यशस्वीपणे पुर्ण करणाऱ्या डागा शासकीय रक्तपेढीच्या चमुचे, आयोजकांनी आभार मानले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिनेश रकतशिंगे, अक्षय रकतशिंगे, पवन रकतशिंगे, संदिप लांजेवार, रविकांत नथ्युजी खेडकर, गणेश फुलबांधे ,अजय फुलबांधे, हरीहर खंडशिंगे, संतोष चन्ने, श्रीकृष्ण चन्ने, संतोष लांजेवार, जनगोपाल खांडेकर, निशिकांत खांडेकर, राकेश मांढरे, मोरेश्वर वावरे, संदीप भांडे, विजय फुलबांधे, प्रफुल मेश्राम यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिराला साक्षोधन कडबे, वैभव तुरक, भुषण सवाईकर व चक्रधर कुंडले यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. शिबिराला महाराष्ट्र नाभिक महामंडळ,नागपूर व आकाशझेप फाउंडेशन,रामटेक यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News