महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपुर तर्फे जिल्ह्याच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
का टा वृत्तसेवा: भुषण सवाईकर
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जिल्हा नागपूर शाखेच्या वतीने नुकताच (दि. ०७ जुन ला) दुपारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. संत नगाजी महाराज मठ, नागपूर येथे आयोजीत कार्यक्रमाचे उदघाटन म. ना. म. प्रदेश कार्याध्यक्ष श्यामजी आस्करकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे व अशोक सालोटकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते अजय चव्हाण मुख्याध्यापक, सेवासदन सोसायटी नागपूर, प्रा. संदीपजी लांजेवार, मातृ सेवा संघ तसेच राजेंद्र फुलबांधे नागपूर जिल्हा अध्यक्ष, प्रमोद मेश्राम, भंडारा जिल्हा अध्यक्ष, मंजुषाताई पाणबुडे, महिला नागपूर जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थितीत होते.
गुणवंत विद्यार्थांना स्व. कमलताई नक्षणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मिताताई नक्षणे आणि प्रविण पारधी यांनी गुणवंतांना प्रोस्ताहनपर पुरस्काराचे वितरण केले. गुणवंत विद्यार्थांना स्मृतीचिन्ह वाटपात माधवीताई अतुल कान्होलकर तसेच राजेशजी देैवलकर यांनी सहयोग नोंदविला आहे. याप्रसंगी वक्त्यांनी विद्यार्थांना यथोचित मार्गदर्शन केले. स्मिताताई नक्षणे आणि नुपुरताई कडवे यांच्या माध्यमातून, ‘‘ट्रू रियालिटी चेंज लाईफ फाउंडेशन’’ च्या वतीने समाजातील गरजू गुणवंत विद्यार्थांना 20 सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच फांउडेशनचे संचालक पंकज पटालीया यांनी अडचणीच्यावेळी शिक्षण व आरोग्य क्षे़त्रात समाजाला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

10th topper तनुश्री विजय घुमे – 97.60%,
12th topper वृद्धी अतुल कान्होलकर – 94.40%
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री कार्याध्यक्ष राजु चिंचाळकर, सरचिटणीस विनेश कावळे, सचिव विजय वलोकर, कोषाध्यक्ष अशोक सुर्यवंशी, उपाध्यक्ष विनोद जमदाडे, डाॅ. नितिन कान्होलकर, संघटक रविंद्र नक्षणे, संपर्क प्रमुख सतिश सुरूसे, युवा अध्यक्ष तुषार मिराशे, तसेच प्रमुख पदाधिकारी नितीन पांडे, प्रविण निंबाळकर, वैभव तुरक, स्वप्नील तळखंडे, योगेश कापसे, पवन धानोरकर, श्याम लांजेवार, अजय अतकरे, नरेंद्र सुर्यवंशी, मनोज कडवे, सुनिल येवले, वनिताताई जाधव, भारतीताई वाटकर, नुपुरताई कडवे, सुषमाताई वाटकर, भावनाताई इल्लोरकर, संध्याताई नंदापूरकर, प्रगतीताई नागपूरकर, करुणाताई इलोरकर, श्वेताताई कोठेकर, संगिताताई कडवे, वर्षाताई नक्षणे, राजश्रीताई लाकुडकर, प्रतिभाताई चन्ने यांनी अथक परिश्रम केले.
सत्कार कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्धी प्रमुख नितेश चौधरी व कु. गौरी राजुरकर यांनी केले. प्रास्ताविक नागपूर जिल्हा उपाध्याक्ष राजेश डेहनकर यांनी तर आभार प्रदर्शन राजश्रीताई इंगळे, महिला सहसंघटिका यांनी केले.