महाराष्ट्र नाभिक समाज महामंडळाचा स्तुत्य उपक्रम

एसएससी व एचएससीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार – 2025

Mahajyoti 
का टा वृत्तसेवा : 
नागपूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जिल्हा नागपूर शाखेच्या वतीने येत्या दि.०७ जुन २०२५, रोज शनिवारला दुपारी ३.३० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नागपूर येथे आयोजीत करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संत नगाजी महाराज मठ, दारोडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू रोड, नागपूर येथे आयोजीत केला आहे.
करीता यावर्षी सन 2025 च्या १0 वी व १2वीच्या परिक्षेत ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांनी किंवा/ तसेच पालकांनी संपर्क सुचीतील महामंडळाचे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. याशिवाय ‘श्यामजी आस्करकर, महामंडळाचे कार्यालय, किल्ला रोड, मुंशी गल्ली, महाल नागपूर’ येथे गुणपत्रिकेची झेराक्स प्रत प्रत्यक्ष किंवा खाली दिलेल्या whatsapp मोबाइल नंबरवर मोबाइल नं. सह गुणपत्रिकेचा फोटो पाठवावा. गुणपत्रिका पाठवायची अंतिम तारिख ०१ जुन २०२५ असून गुणवंत विद्यार्थी हा नाभिक समाजाचा व नागपूर जिल्ह्यातील रहिवाशी असावा.
संर्पक : – सतिश सुरूसे  9766123660
             ♦ तुषार मीराशे  8956810348
             ♦ पवन धानोरकर  9579216109
             ♦ सौ. भावना इलोरकर  9422831063


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News