बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
मोहपा : येथील बॅरि. शेषराव वानखडे महाविद्यालय ,मोहपा येथे शनिवारी दि. 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला
महिलांनी व्यस्त कार्यातून आपल्या छंद व कलांना जोपासले पाहिजे. छंद, कला या सुद्धा व्यक्तींना एका विशिष्ट उंचीवर पोहोचवत असतात. तसेच छंद, कलेत वेळ घालवत असताना वैयक्तिक तसेच सामाजिक आनंद मिळत असतो, असे विचार मस्कत येथून आलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या नीलिमा डोणगावकर यांनी व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. मारोती कोल्हे यांनी अध्यक्षीय भाषणातून शिक्षणामुळे स्त्रिया सामाजिक प्रवाहात येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे, असे विचार मांडले. याप्रसंगी प्रा. अनिता गणोरकर, प्रा. डॉ. विनोद भालेराव, प्रा. डॉ.प्रमोद वडते, ग्रंथपाल डॉ. धनंजय देवते
आदींनी महिलांच्या विशेष कार्य व कर्तृत्वावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक क्रीडा निदेशक डॉ. अलका थोडगे यांनी केले. संचालन कु. आर्या कळसाईत तर आभार महेक शेख हीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन काळे, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. पवन उमक, शुभम वाघ, चैतन्य सुपले, अजय अंजनकर, रजनी अकर्ते, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे आदींनी सहकार्य केले.