का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे कळमेश्वर : वरोडा येथील मानकर आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 94 टक्के तर बारावीच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 98 टक्के तर कला शाखेचा निकाल 94 टक्के लागला आहे. वर्ग दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत 89 टक्के गुण मिळवून श्लोक डाखोळे हा शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तर हिमांशू बेंडे याने 87.20 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कु. सुहानी पांगूळ ही 82.80 टक्के गुण घेऊन गुणानुक्रमे तीसरी आली आहे. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यापैकी 14 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त असून 15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक रमेश मानकर, सचिव प्रिया मानकर व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका जया मानकर व शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा कौतुकासह शुभेच्छा देऊन यथोचित सत्कार केला. तसेच यापुढील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक बेले, ढगे, वाघ, भिंगारे इ. सह विद्यार्थ्यांचे पालक व स्थानिक नागरिकही उपस्थित होते.