दुचाकी प्रज्ञांची अन् कर्नल पुरोहित RDX घेऊन आले,
या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत – NIA कोर्ट
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता. पीडितांचे वकील शाहिद नवीन अन्सारी म्हणाले- आम्ही एनआयए न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करू. या प्रकरणात तपास संस्था आणि सरकार अपयशी ठरले आहे.
![]()
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे १०० जण जखमी झाले होते. सुमारे १७ वर्षांनंतर दिलेल्या निकालात न्यायाधीश ए.के. लाहोटी म्हणाले की, तपास यंत्रणा आरोप सिद्ध करू शकलेली नाही, त्यामुळे आरोपींना संशयाचा फायदा मिळावा. न्यायाधीश लाहोटी म्हणाले की, स्फोट झाला होता, परंतु मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध झाले नाही. मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर होती हे देखील सिद्ध झाले नाही. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब बनवला होता हे देखील सिद्ध झाले नाही.
![]()
या प्रकरणाचा निर्णय ८ मे २०२५ रोजी देण्यात येणार होता, परंतु त्यानंतर न्यायालयाने तो ३१ जुलैपर्यंत राखीव ठेवला. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा प्रारंभिक तपास महाराष्ट्र एटीएसने केला होता. २०११ मध्ये हा खटला एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने २०१६ मध्ये आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात ३ तपास संस्था आणि ४ न्यायाधीश बदलले आहेत.
2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
घटना दिनांक : 29 सप्टेंबर 2008
स्थळ : भिक्कू चौक, मालेगाव, नाशिक जिल्हा
घटना : नवरात्र उत्सवाच्या काळात एका मोटरसायकलवर बॉम्ब लावून ती मस्जिदजवळ स्फोट घडवण्यात आली. परिणाम : 6 मृत्यू, 100 हून अधिक जखमी
![]()
सुरुवातीला : महाराष्ट्र एटीएसने तपास केला.
2011 पासूनर : प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे सोपवले गेले.
महत्त्वाचे आरोप : मोटारसायकलवर बॉम्ब ठेवला गेला. ती मोटरसायकल प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचा आरोप. स्फोटातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू होता, असा आरोप.
आरोपी व गुन्हे
आरोपी : प्रज्ञा सिंह ठाकूर – सध्या भाजप खासदार, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय रहीरकर, सुधाकर द्विवेदी, सामीर कुलकर्णी, चतुर्वेदी
गुन्हे : भारतीय दंड संहितेचे कलम 302 (खून), 307 (हत्या करण्याचा प्रयत्न), 153-। (धर्माद्वारे तेढ निर्माण)
न्।च्। (दहशतवादविरोधी कायदा)
निकाल (31 जुलै 2025)
विशेष NIA न्यायालय, मुंबई : सर्व 7 आरोपी निर्दोष मुक्त
![]()
मुख्य कारणे : ठोस पुरावे नसणे, तपास प्रक्रियेत त्रुटी, अनेक साक्षीदार झाले पाठ फिरवणारे (ीवेजपसम) मोटरसायकलचा संबंध प्रज्ञा ठाकूर यांच्याशी जोडता आला नाही. न्यायालयाचे म्हणणे: ‘दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. केवळ संशयावर शिक्षा करता येत नाही.’

नुकसानभरपाई : मृतांच्या कुटुंबीयांना ₹. 2 लाख, जखमींना ₹. 50,000
घटनाक्रम : वर्ष घटना 2008 स्फोट झाला, एटीएसने तपास सुरू केला, 2011प्रकरण छप्। कडे गेले, 2018 आरोप निश्चित झाले, खटला सुरू झाला. 2025 (एप्रिल), अंतिम युक्तिवाद संपले, निकाल राखून ठेवला. 31 जुलै 2025,
न्यायालयाचा निकाल – सर्व आरोपी निर्दोष
‘मग 6 लोकांना मारले कोणी?’ हा प्रश्न अनूत्तरीत आहे.
प्रतिक्रिया : काहींनी न्याय मिळाला असे म्हटले, तर अनेकांनी गंभीर तपास अपयश आणि बळी गेलेल्या मुस्लिम समुदायाला न्याय न मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. राजकीय पक्ष व मुस्लिम संघटनांची नाराजी.
![]()