February 7, 2026 2:51 pm

मोठ्या ताजबागमध्ये सामुदायीक निकाहात ५३ दाम्पत्यांचा सहभाग

‘निकाह’ हा जीवनाचा महत्वाचा संस्कार, मनोरंजन नाही : ज्ञानेश्वर रक्षक

का टा वृत्तसेवा : 

नागपूर : मानवी जीवनात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह ज्याला आमचे मुस्लीम बांधव ‘निकाह’ म्हणून संबोधतात. आज विवाहाचे पवित्र बंधन श्रीमंतीच्या प्रदर्शनात अडकत आहे. मुळात विवाह हा संस्कार आहे, मनोरंजन नाही. दोन जीवांचे मिलन हे दोन परिवाराच्या आजन्म साक्षीचा सोहळा असतो. पण श्रीमंतांच्या अंधरूढ्या गरीबांना जीवघेण्या ठरतात, पुढे बोलतांना रक्षक म्हणाले श्रीमंताची मक्तेदारी गरीब परिवारांना दुःखी करते. अशा प्रकारचे सामुदायीक विवाह सोहळे होणे काळाची गरज आहे. असे प्रतीपादन राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्याचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केले आहे.
‘फैजाने ताजुन औलिया ट्रस्ट’ द्वारा आयोजीत सामुदायीक निकाह सोहळा नुकताच ( दि. 11 मे 2025 ला) मोठा ताजबाग परिसरात संपन्न झाला. ५३ जोडपे यात सहभागी झाले होते. या ट्रस्टचे संस्थापक मौलाना इर्शाद आणी यांना तन, मन, धनाने मदत करणार्यांचे आभार मानायला हवे. नव जोडप्यांना लोकसहभागातून गृहस्थीसाठी लागणार्या सीलेंडर-शेगडी, पलंग, रोजच्या वापराची भांडे, लोखंडी आलमारी देणार्या दानदात्यांना नावाची अपेक्षा नाही. म्हणूनच हा निकाह सोहळा प्रेरणादायी ठरतोे.
                      याप्रसंगी सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद ठाकरे आणि श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे रामराव चोपडे यांनी नवदाम्पत्याचे कौतुक करीत ताजबाग परिसराच्या पवित्र भूमीवर निकाह होत आहे. यांच वैवाहीक जीवनही असच पवित्र राहील अशा शुभेच्छा दिल्या. निकाह सोहळ्याला अंदाजे तीस हजार लोकांची उपस्थीती असली तरीही, शिस्तबध अतीशय शिस्तबध झाल्यात. कुठलाही डीजचा कर्कश आवाज नाही, बँड नाही. फक्त हजारोंचे आशिर्वादाचे हात! सर्वच धर्म, पंथ, संप्रदायांनी अशा प्रेरणा जपाव्यात असे विचार मान्यवर व्यक्त करीत होते.

                        या सामुदायीक निकाह सोहळ्याला हाजी अब्दुल हसन ताजी खुर्शीद आलम (शाही इमाम ताजा बाद शरीफ), ताज अहमद राजा सेक्रेटरी, ताजुद्दीन बाबा दरगाह, काजी रियाजुद्दीन, मुश्ताक, शोएब भाई, आसिफ भाई, जुबेर सूर्य, सिकंदर शेख, सैयद सलीम, तनवीर सूर्य, मुस्तकीम भाई यांच्या अथक परिश्रमाने हा ताजबाग परिसराच्या पवित्र भूमीवरचा सामुदायीक निकाह सोहळा उपस्थीतांच्या चीरस्मरणात राहिल. यात शंका नाही.

♦ आनंद अंबरते


0
0

Leave a Reply

Realted News