ग्रामिण भागातल्या विद्यार्थ्यांना सुध्दा उच्चत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे – आ. डॉ. आशिष देशमुख
का टा वृत्तसेवा : भुषण सवाईकर
कळमेश्वर : मोहपा येथे नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीचे लोकार्पण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदय, आमदार व इतर सर्व पाहुण्यांनी सर्व वर्गखोल्यांची व शाळेची पाहणी केली. शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा उत्कृष्ट असल्याचे तसेच वर्गखोल्यातील डिजिटल साहित्य व सर्व फर्निचरने सुसज्ज इमारतीचीे पालकमंत्री महोदयांनी व पाहुण्यांनी प्रशंसा केली.
याप्रसंगी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या तत्पर कार्याची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणाले, “तुम्ही सावनेर विधासभा क्षेत्रामध्ये परिवर्तनासाठी अविरत प्रयत्नरत आहात. जनतेने डॉ आशिष देशमुखांसारख सारखा लढवय्या कार्यकर्ता विधानसभेत पाठविला आहे, जो आपले विधानसभाक्षेत्रात जनहितार्थ कार्यरत आहेच, तद्वतच् विधानसभा सभागृहातही सतत लोकांसाठी संघर्षरत आहे.” मागील 25 वर्षाचा रखडलेला विकास ते याच 5 वर्षात भरून काढतील आणि या क्षेत्राचा सर्वांगीण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी मजबूत पांधण रस्ते तयार करणे, त्यांना दिवसा 12 तास वीज व वीज बिलाचा एकही पैसा घ्यायचा नाही असा निर्णय फडणवीस सरकार ने घेतला असल्याचे बावनकुळे म्हणाले.
आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी मोहपावासियांचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या वक्तव्यात आश्वासित केले की, सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणू आणि ग्रामीण तसेच शहरी शिक्षणामध्ये जो फरक आहे तो दूर करून ग्रामीण सरकारी शाळेत उच्चत्तम शिक्षण मिळेल अशी व्यवस्था करू. डिजिटल शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून सुद्धा मोठमोठे अधिकारी घडतील. याकरिता शिक्षणावर विशेष भर देत काॅन्व्हेंट व CBSE सारखे शिक्षण, जिल्हा परिषद शाळेत मिळण्याकरिता शाळेचा दर्जा वाढविण्याचे धोरण सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये राबवू. तसेच नवीन पोलीस स्टेशनचे नोटिफिकेशन लवकर काढुन देण्याची विनंतीही आ. देशमुख यांनी पालकमंत्री महोदयांना केली. त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन केले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये डाॅ. राजीव पोतदार, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती ना. जि. यांचेसह रमेश मानकर, माजी अध्यक्ष, जि. प. नागपूर, अशोक धोटे, माजी अध्यक्ष जि. प. नागपूर, मनोहर कुंभारे, अध्यक्ष, भाजपा ना. जि. ग्रा, बापुसाहेब हळदे, माजी सदस्य, न. प. मोहपा, मिना तायवाडे, माजी सभापती, पं. स. कळमेश्वर, अजय वाटकर, अध्यक्ष, संजय गांधी निराधार अ. समिती, कळमेश्वर, दिलीप धोटे, माजी अध्यक्ष, भाजपा तालुका कळमेश्वर, इमेश्वर यावलकर माजी अध्यक्ष, न. प. मोहपा, मंगेश चोरे, महामंत्री भा.ज.पा. कळमेश्वर तालुका, संदीप उपाध्ये, माजी अध्यक्ष, प्रमोद हत्ती, अध्यक्ष व मनोज मांडवगडे, महामंत्री भाजपा कळमेश्वर, सोपीनाथ चांदेकर, मनिष देशमुख, तहसीलदार रोशन मकवाने, मुख्याधिकारी योगिता डांगरे, मुख्याध्यापक मोहन चतुर, वनिता काकडे, शीला सातपुते, ज्योती श्रीखंडे, चंद्रकांत गहुकर, रोहीत सिंग इ. न.प. कर्मचारी व मोठया संखेने नागरिक उपस्थित होते.
प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रत्नमाला मांडवकर यांनी तर, आभार प्रदर्शन श्रीकांत येणुरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
