February 7, 2026 7:22 am

मोहपा पाठोपाठ कोहळीतही चोरट्यांचा हैदोस, दुचाकीसह 35,000 रुपयांचा ऐवज लंपास!

कोहळीतही चोरट्यांचा हैदोस, दुचाकीसह 35,000 रुपयांचा ऐवज लंपास

काटा वृत्तसेवा I 
कळमेश्वर  (18 ऑक्टोबर) :  कळमेश्वर तालुक्यातील कोहळी गावात बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच वेळी दोन दुकाने फोडून रोकड आणि दुचाकी असा एकूण ३५,००० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
                       पीडित दुकानदार चंदू धनराज काकडे (वय ३३) रा. कोहळी यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते कोहळी गावात भाड्याने घेतलेल्या दुकानातून जनरल स्टोअर व डेली निड्सचे दुकान चालवतात.
                        ते नेहमीप्रमाणे 17 ऑक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता दुकान बंद करून मोटरसायकल (क्र. MH 40 BU1118) दुकानासमोर अंगणात हँडल लाॅक करून घरी गेले. मात्र 18ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्यांना दुकानाचे लाॅक तुटलेले आढळले. दुकानाच्या काउंटरमधून अंदाजे 10,000 रुपये रोख रक्कम गायब होती, तसेच दुकानाबाहेर लावलेली काळ्या रंगाची युनीकाॅर्न मोटरसायकल देखील चोरीला गेली होती.
                        तसेच, याच दरम्यान समोरच असलेल्या भवानी मेडिकल स्टोअर्स आणि धनश्री सुपर बाजार ही दुकाने देखील फोडण्यात आली असून, तेथूनही अंदाजे 10,000 रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे दुकानदार चंद्रशेखर जानरावजी निमकर (वय 50) यांनी सांगितले.
                        या प्रकरणी चंदू काकडे यांनी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना 17 -18 ऑक्टोबर रात्री 10.30 ते 18 आॅक्टोबर सकाळी 7.30 या वेळेत घडली आहे.
                        पोलीसांनी घटनास्थळी दाखल होउन सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हेगारांचा मागोवा घेणे सुरू आहे.  पोलीस तपास सुरू असून, चोरी करणारे अज्ञात आरोपी लवकरच गजाआड जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. गावात सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

0
0

Leave a Reply

Realted News