मोहपा नगर परिषद हद्दीतील सर्व मिळकतींची होणार फेरचौकशी
का टा वृत्तसेवा I कळमेश्वर : जिल्हा अधीक्षक भूमी सर्व अभिलेख नागपूर यांच्या आदेशान्वये मोहपा नगरपरिषद हद्दीतील मिळकतींची फेरतपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर राबविण्यात येणार आहे.
दि. ३, ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी नगरपरिषद कार्यालय मोहपा या ठिकाणावरून फेरचौकशीचे काम सुरु होणार असून, संबंधित मिळकतधारकांनी आपल्या मिळकतीवर प्रत्यक्ष हजर राहून सर्व मूळ दस्तऐवज तसेच त्याच्या छायांकित प्रती ज्यामध्ये खरेदी खत, भाडेपट्टा, सनद, नकाशा, आखिव पत्रिका, असिसमेंट कॉपी आदी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.
या फेरतपासणी प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपअधीक्षक भूमी अभिलेख मिलिंद शिंदे यांनी केले आहे.











Users Today : 3
Users Yesterday : 11