“अर्थशास्त्र व रोजगाराचा संधी” या विषयावर व्याख्यान
मोहपा I : स्थानिक बॅरि. शेषराव वानखेडे महाविद्यालयात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन तसेच अर्थशास्त्र व रोजगाराचा संधी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाचा सुरुवातीला दीप प्रज्वलन व बॅरि. शेषराव वानखेडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ. अलका थोडगे होत्या. तर उद्घाटक व प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विजय रहांगडाले, अरविंदबाबू देशमुख महाविद्यालय भारसिंगी हे उपस्थित होते. डॉ. विजय रहांगडाले यांना नुकतीच पीएच.डी. पदवी बहाल झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचा वतीने त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. रहांगडाले यांनी रीतसर अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करून आधुनिक युगात अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासामुळे अनेक रोजगाराचा संधी मिळू शकतात, असे विचार विशद केले. शिवाय स्पर्धा परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयाचे महत्त्व काय आहे, हे पटवून देत असताना यूपीएससी, आयएसएस, एसएससी, एमपीएससी, रिझर्व बँक व खाजगी बँक अशा विविध क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्र विषयाशी संबंधीत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अलका थोडगे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आताच कठोर परिश्रम घेऊन चांगले शिक्षण घेतले तर त्यांना पुढील आयुष्यात अर्थप्राप्ती करणे कठीण जाणार नाही, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे परिचय अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लिलाधर खरपूरिये यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आपल्या विभागाचा वतीने वर्षभर जे विविध उपक्रम राबवितो, त्याबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले. शिवाय विद्यार्थ्यांची अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासात आवड निर्माण व्हावी. याकरिता अभ्यास मंडळ शैक्षणिक सहलींचे आयोजन करतात. तसेच जागतिक व राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घडामोडीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते, असे सांगितले.
प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे जेष्ठ प्राध्यापक डॉ. प्रमोद वडते व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला डॉ. संजय ठवळे, प्रा, सचिन काळे, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. सिद्धार्थ चनकापुरे, प्रा. पवन उमक, प्रा. शुभम वाघ, सौ. कल्पना देवळे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय अंजनकर, रजनी गणोरकर, प्रदीप बगडे, अरविंद डहाट, प्रकाश कोकोडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विनोद भालेराव यांनी केले तर आभार प्रा. अनिता गणोरकर यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.















Users Today : 3
Users Yesterday : 11