February 7, 2026 2:42 pm

मोहप्यात एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली

दिपावलीच्या शुभमुहूर्तावर तीन अज्ञात चोरट्यांची धडाकेबाज कारवाई

चोरट्यांनी घेतला मोहपा नगरीच्या सुरक्षेचा आढावा?

काटा वृत्तसेवा : भूषण सवाईकर 
मोहपा : आज मध्यरात्री तीन ते चार च्या दरम्यान घडलेल्या सणसनीखेज घटनेत संपूर्ण मोहपा नगरी शांत झोपेत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मोहपा शहराच्या सुरक्षेचा कसून आढावा घेत सलग पांच दुकाने फोडली. घटनेत देशी दारूसह अंदाजे 40 ते 50 हजाराचा मुद्येमाल लंपास केल्याचे कळते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तोंड बांधलेल्या चोरट्यांची संख्या तीन असल्याचे दिसून येते.
                         मोहप्यातील बाजार चौक व आठवडी बाजारातील जनसामान्यांच्या हृद्यस्थानी असणाऱ्या शासनमान्य देशी दारूच्या दुकानासहीत पाच दुकाने फोडून, देशी दारूसह अंदाजे 40 ते 50 हजाराचा मुद्येमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे कळते. गावातील अन्य सीसीटीव्हीचा तपास करता अधिक माहिती मिळण्याची शक्यता दुकानदारांनी वर्तवली आहे.
                         पोलिसांना घटनेची सूचना मिळाल्यानंतर एक पोलीस कर्मचारी आपल्या होमगार्ड सहकाऱ्यासह पोलीस वाहनातून घटनास्थळी दाखल होउन कारवाई करताना आढळून आले. कळमेश्वर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करण्याची सूचना पोलिसांनी दिल्याचे कळते.
                        घटनेने मोहपा नगर परिषद क्षेत्र व परिसरातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांची रात्रीची गस्त बंद असल्याची, तसेच पोलीस चौकीचाही कोणी वाली नसल्याने नागरिकांची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर असल्याची गंभीर माहिती मोहप्याचे माजी नगराध्यक्ष इमेश्वर यावलकर, माजी नगरसेवक श्रीकांत येनुरकर व प्रतिष्ठीत व्यापारी व सामाजीक कार्यकर्ते रविंद्र गाडगे यांचेसह दुकानदार व नागरिकांनी दिली आहे.
घटनेची दखल घेतांना पोलीस कर्मचारी
घटनेची दखल घेतांना पोलीस कर्मचारी
                       महत्त्वाचे म्हणजे मोहपा येथे लवकरच नवीन पोलीस स्टेशन मंजूर झाल्याची घोषणा राज्याचे मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे, महसुल मंत्री यांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवनमरणाचे प्रश्न जसे रोजगार, आरोग्य, शिक्षण, अन्न, निवारा, स्वच्छता, दैनंदिन वापराच्या वस्तू जसे गॅस, वीज इ. महागाई या सारखे गंभीर जीवनमरणाचे प्रश्न निश्चितपणे सुटणार नसले तरी, या घोषणेने मोहपा हद्यीतील जनता मात्र काहीतरी मोठं घबाड हाती लागल्यागत गर्भगळीत झाली आहे. परंतू जनतेच्या पदरी निराशाच आहे.

                     अशात एकाच वेळी भर रस्ता-चौकातील पाच दुकाने एकाच वेळी फोडण्याच्या अत्यंत लाजिरवाण्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
                      प्राप्त माहितीनुसार अतुल पांडे यांच्या तुलसी औषधी दुकानातून अंदाजे दहा हजार रुपये नगदी,  येनुरकर यांच्या साई बूट हाऊस दुकानातून अंदाजे बारा ते पंधरा हजार रुपये, देशी दारू दुकानातील सात ते आठ हजार रुपयांचा नगदी व देशी दारू तसेच सोहम ट्रेडर्स या बिल्डिंग मटेरियल सप्लायच्या दुकानातून दहा हजार रुपये नगदी गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिक तपशील अर्थात घटनाक्रम, गुन्ह्याची दखल (FIR), चोरीस गेलेला एकूण ऐवज?, तपासी अमलदार? , तपासाची दिशा?, आरोंपींसह दुकानफोडीतील चोरीस गेलेल्या मालाची वापसी? इ. पोलीसांकडून अधिकृतरित्या प्राप्त झाल्यावर लवकरंच् …

1
0

Leave a Reply

Realted News