February 7, 2026 8:39 am

यूको बँक मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

यूको बँक मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

मोहपा (ता. कळमेश्वर) | दि. ६ जानेवारी २०२६
सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या यूको बँक (युनायटेड कमर्शियल बँक) मोहपा शाखेचा ८४ वा वर्धापन दिन मंगळवार, ६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास बँकेचे ग्राहक, व्यापारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यूको बँक मोहपा शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री. निग्रोध नारनवरे होते. त्यांनी आपल्या भाषणात यूको बँकेच्या ८४ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेत ग्रामीण व शहरी विकासाबरोबरच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बँकेने दिलेल्या योगदानाची माहिती दिली. महिला बचत गटांना कर्जपुरवठा, आर्थिक सहाय्य तसेच डिजिटल बँकिंग सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्त यूको बँक मोहपा शाखेच्या वतीने नगर परिषद मोहपा यांना सीआरएफ (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी) अंतर्गत सामाजिक उपक्रमांसाठी मदत प्रदान करण्यात आली. या मदतीमुळे नगर परिषदेच्या विविध सार्वजनिक सेवा व विकासकामांना चालना मिळणार आहे. यावेळी नगराध्यक्ष श्री. माधव चर्जन व नगर परिषद मोहपाच्या मुख्याधिकारी सौ. स्नेहलता कुंभार उपस्थित होते.

या प्रसंगी यूको बँकेच्या उत्कृष्ट व विश्वासू ग्राहकांचा भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यामध्ये हरिदास ताजने, सुरेश चिमोटे व विरेंद्र येनुरकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमास बँकेचे कर्मचारी नुदरत सैयद, चेतन नासरे व विक्रम मोहबिया उपस्थित होते. तसेच महिला बचत गटांच्या बँक सखी सौ. सुनिता ढोके आणि सुसुंद्री ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सविता काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. दिनेश नाठे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी यूको बँक मोहपा शाखेच्या सामाजिक व आर्थिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

1
0

Leave a Reply

Realted News