राज्यातील 246 नगरपरिषदांचे निकाल आज जाहीर होणार
सकाळी 10 पासून मतमोजणी; 66 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात
मुंबई : राज्यातील 246 नगरपरिषदांमध्ये आणि 42 नगरपंचायतींमध्ये सदस्यपद तसेच थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दुपारी 3 वाजेपर्यंत बहुतांश निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
![]()
या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. एकूण 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून सुमारे 66,775 अधिकारी-कर्मचारी मतमोजणीसाठी तैनात असणार आहेत, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
![]()
![]()
![]()