वर्धा : शहरातील पोलिस कर्मचारी व त्यांचा परिवार चारचाकी वाहनाने मांडगाव येथील श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त महाप्रसादाच्या कार्यक्रमाला गेले होते. परतीचा प्रवास करत असताना जंगली जनावराला वाचवण्यासाठी त्यांचे वाहन दुभाजकाला धडकले आणि त्या भीषण अपघातात त्यांची पत्नी व मुलगा जागीच ठार झाले तर पोलिस कर्मचारी व त्यांची मुलगी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचीही प्राणज्योत मालवली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास मांडगाव येथील मार्गावर घडली.
प्रियंका वैद्य व श्रेयस वैद्य अशी मृतांची नावे आहेत. शहरातील प्रशांत मधुकर वैद्य वय(४५) रा प्रताप नगर वर्धा हे वडनेर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असून दिनांक ७ एप्रिल रोजी मांडगाव येथील श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाकरिता प्रशांत वैद्य त्यांची पत्नी प्रियंका वैद्य वय (३७) मुलगा श्रेयस वैद्य व्यव (६) मुलगी माई वय (३) हे चौघेही एम एच ४० के आर ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहनाने मांडगाव येथे केले होते. महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परतीचा प्रवास करीत असताना मांडगाव जवळच रस्त्याच्या मधोमध त्यांच्या वाहना समोर एक जंगली जनावर आले आणि त्या जनावराला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे वाहन दुभाजकाला धडकले.
या भीषण अपघातात त्यांची पत्नी प्रियंका व मुलगा श्रेयस या दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर प्रशांत वैद्य व त्यांची मुलगी माई हे दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेदहा वाजताच्या दरम्यान घडली.
भीषण अपघात घडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळतात त्यांनी तात्काळ पोलीस व रुग्णवाहिकेला पाचारण केले. आणि जखमींना तातडीने सेवा ग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन वर्षीय मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते तर प्रशांत वैद्य गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचाही मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.