April 12, 2025 10:16 am

वन्य प्राण्यांच्या हैदोसाने होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची भरपाई, शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावी: आमदार डाॅ. आशिष देशमुख यांची मागणी

♦ वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतीच्या नुकसानी सोबतच् कित्येकदा मनुष्यहानी पण होते

मुंबई  : वन्य प्राण्यांच्या हैदोसाने होणाऱ्यां शेतीच्या नुकसानीची भरपाई, शेतकऱ्यांना ताबडतोब मिळावी: आमदार डाॅ. आशिष देशमुख यांची मागणी सन 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. वन्य प्राण्यांच्या संदर्भात मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी मा. वनमंत्री व संबंधित अधिकारी यांचे समवेत दिनांक 19 मार्च 2025 ला मुंबई विधानभवन येथे बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये आमदार डाॅ आशिष देशमुख यांनी सावनेर – कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामधील वनविभागाअंतर्गत येणाऱ्या समस्या व वन्यप्राण्यामुळे होणारे नुकसान याबाबत सखोल मुद्दे संबंधित सर्व अधिकाऱ्यांसमोर मांडले. शेतकरी अहोरात्र मेहनत करून आपला उदरनिर्वाह चालविण्यासोबतच् देशाची खरी सेवा करतो. त्यामध्ये वन्यप्राण्यांचे कळप हैदोस घालून शेतातील उभ्या पिकांचे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करतात. त्याबाबत वन पीक विमा मिळावा व त्याचा पंचनामा सरळ वनविभागाकडून व्हावा, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळण्यास मदत होईल.

                         प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये रेंजरचा फोटो अत्यावश्यक आहे. अनेकदा वाघ व इतरही वन्य प्राणी जंगल सोडून गावात, शेतामध्ये शिरकाव करून शेतासोबतच् कित्येकदा मनुष्यहानी पण होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होते. अश्या हिंस्त्र वन्य प्राण्यांना पकडण्यासाठी पिंजरा उपलब्ध करून देण्याची तसेच महत्वाचे म्हणजे रानडुक्करांची पैदास खुप मोठ्या प्रमाणात होत असल्याने रानडुक्करे कळपाने येवून शेतीचे अतोनात नुकसान करतात. याची गांभिर्याने दखल घेवून जंगलाला लागून असलेल्या शेतीला जाळीचे कुंपणाची योजना शेतकऱ्यांना मंजूर करून त्यांच्या शेतांचे व जीवीतांचे रक्षण करण्याची मागणीसह वनविभागाअंतर्गत येणाऱ्या विवीध प्रकारच्या समस्या आमदार देशमुख यांनी बैठकीत मांडल्या. या बैठकीमध्ये अन्य विधानसभा सदस्य व सर्व वनविभागाचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News