♦ नागपूर दंगलीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी, शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजीही
♦ सावनेर : सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांचा संदेश…
नागपूर : नागपूर मध्ये झालेल्या दंगलीवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये दंगल नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगली दरम्यान करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याने आता या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.









