कळमेश्वर (ता. 5) : आज दिनांक 5 रोजी ग्रामपंचायत वरोडा हद्दीतून वाहणाऱ्या खडक नदी च्या पात्रात एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आला. ग्रा. पं. च्या पाणीपुरवठा विहिरीजवळ आढळून आलेल्या या मृतदेहाची सुचना पिंटू निकोसे यांनी ग्रामपंचायत सरपंच संगीता वासनिक यांना फोन वरून दिली. सरपंच वासनिक यांनी पोलीस पाटील प्रतिभा काकडे यांचेसह घटनास्थळी धाव घेतली व पोलीस स्टेशनला घटनेची सुचना दिली.
सामाजिक कार्यकर्ते मंगेश गमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरिय तपासणीसाठी रवाना केला. मृतकाची ओळख पटली असून मृतकाचे नांव नरेश लक्ष्मण पंडे, वय 50 वर्षे असून मृतक वरोडा येथीलच रहिवासी आहे.
कळमेश्वर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मर्ग तपासात घेतला असून मृत्युचे कारण समजले नाही.