February 7, 2026 8:38 am

वानखडे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

वानखडे महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी

मोहपा : लोक विद्यापीठ, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त बॅरिस्टर शेषराव वानखडे महाविद्यालय, मोहपा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन नुकतेच (दि. २० डिसेंबर २०२५) करण्यात आले. या उपक्रमांमध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम, सामाजिक जनजागृती, आरोग्य जनजागृती तसेच महिला सुरक्षितता व सक्षमीकरण यासंदर्भातील कार्यक्रमांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अलका थोडगे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून जीवन जगावे तसेच समाजात एकोपा निर्माण करण्याची जबाबदारी महाविद्यालयीन तरुणांनी घ्यावी, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मराठी विभागाचे प्रा. सचिन काळे होते. त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या दहा कलमी कार्यक्रमाचे समाजोपयोगी महत्त्व स्पष्ट केले. तसेच डॉ. प्रमोद वडते व डॉ. लीलाधर खरपुरिये यांनीही संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्य व कार्यकर्तृत्वावर सविस्तर प्रकाश टाकला.

मोहपा येथील डॉ. आरिफ शेख यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून तरुणांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विनोद भालेराव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. धनंजय देवते, प्रा. अनिता गणोरकर, प्रा. शैलेश हातबुडे, प्रा. शुभम वाघ, श्रीमती कल्पना देवळे, हरिश्च अंजनकर, रजनी अकर्ते, प्रदीप बगडे, अरविंद डहाट व प्रकाश कोकोडे आदींनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवन उमप यांनी केले, तर आभार प्रा. सिद्धार्थ चणकापुरे यांनी मानले.

0
0

Leave a Reply

Realted News