शिक्षण संचालकाने काढलेले आदेशपत्र हे मा. उच्च न्यायालयाचा अवमान

शिक्षण संचालकांनी ‘28 एप्रिल’चा अन्यायकारक आदेश परत घ्यावा: विदर्भ शिक्षक संघाचा इशारा

काटा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर
नागपूर: 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयातील पट संख्येवर आधारीत निकषांवर होणार्या 2024-25 च्या संचमान्यतेला मा. उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगिती देणारा मा. उच्च न्यायालयाचा चा आदेश असताना, तसेच सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना, सुद्धा दि. 28 एप्रिल 2025 रोजी शिक्षण संचालकाने काढलेले आदेशपत्र हे मा. उच्च न्यायालयाचा अवमान करणारे आहे. सदर आदेश तात्काळ परत घेण्यात यावे. अशा आशयाचे निवेदन आज शिक्षण उपसंचालक मार्फत शिक्षण संचालकांना देण्यात आले.
                        सदर प्रकरण मा. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी जूनला असल्याचे समजते. असे असतांनाही  शिक्षण संचालकाने काढलेले आदेशपत्र अन्यायकारक व बेकायदेशीर असून यावर विदर्भ शिक्षक संघाने तीव्र आक्षेप घेत आंदोलन तसेच शिक्षण विभागावर न्यायालयाची अवमानना केल्याचा खटला सुद्धा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
                       प्रसंगी विदर्भ शिक्षक संघांचे प्रांतीय सरकार्यवाह नामा जाधव, जिल्हा शहर अध्यक्ष पंकज नाईक, जिल्हा शहर सरकार्यवाह रामचंद्र घरजाळे, कार्यवाह सगीर अहमद कार्याध्यक्ष मोहंमद गौस, आरिफ पठाण, मनिष निंबाळकर, डोंगरदिवे इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News