कु. भावना सुरेंद्र हिवरकर श्री कोल्बास्वामी महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण
धापेवाडा : एच .एस .सी बोर्ड निकाल नुकताच जाहीर झाला असून स्थानिक श्री कोल्बास्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धापेवाडा येथील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. प्रथम क्रमांक कु. भावना सुरेंद्र हिवरकर या विद्यार्थिनी 72 %, द्वितीय क्रमांक कु. जानवी योगीराज बंड हिने 68.33 टक्के घेऊन तसेच कु. राखी मधुकर वानखेडे हिने 65.83 टक्के घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. माजी मंत्री सुनील केदार तसेच संस्थेच्या सचिव सुहासताई केदार यांनी केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय उईके, पर्यवेक्षिका शामली चाणीकर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रा. शीतल कांडलकर प्रा. बाळू राठोड प्रा. जितेंद्र ठाकरे सर्व शिक्षक वृंद व पालकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.