February 7, 2026 3:54 pm

”संत मालिकेतील मातृह्दयी संत शकंर महाराज!”

संत हेच भूमीवर! चालते बोलते ईश्वर!!

: माणिकदास बेलूरकर, संत साहित्य अभ्यासक
                   संतांचे जीवन चरित्र हे द्राक्षाप्रमाणे असते. ते कुणालाही चालते, पचल्या जाते तो वृद्ध, म्हातारा, तरूण कुणीही असो, ते पचविण्यास जड जात नाही. परंतू नेते, पुढारी यांचे जीवन भिलावे, बिब्याप्रमाणे ते कुणालाही उपजू शकते. दोघांच्या जीवनात हा फरक दिसून येतो. म्हणूनच प्रांत;स्मरणीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्या भजनात लिहतात, ‘ संत सांगती ते, ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो, कीर्तनी मान, डोलतो परी, कोंबडी – बकरी, खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो!’  ‘कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो!’ पंढरीला किंवा तिर्थक्षेत्री जायचे असेल तर, संताचेच म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपला जीवनरथ चालविला पाहिजे.
                       महाराष्टू हा संतांचा देश, आळंदीच्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधीस्त होवून आज ७५० वर्ष झाली. त्याच परंपरेतील वरखेड निवासी संत परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू आडकुजी महाराज यांना २०४ वर्ष झाली. तरीपण संतांची ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. याला कारणं ‘संत-संत-संत-न लागे त्याचा अंत ‘ परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू लहानुजी महाराज, परमहंस श्रीसंत सत्यदेव महाराज व विश्वसंत श्री तुकडोजी महाराज याच मालिकेतील, ‘प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा, परंतू उद्देश मात्र एकच, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारे!’
                                अश्याच संत मालिकेतील मातृहदयी संत शकंर महाराज यांचा जन्म इ.स. १९५६ साली पिपंळखुटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथे पिताश्री श्री बुधाजी नागपूरे व मातौश्री भागीरथाआई नागपूरे यांच्या पोटी झाला. तो दिवस आजचा काजळती हरितालिकेचा होता. घरी अठरा विश्व दारिद्रय अशा अवस्थेत बाल वयात तपसाधना सुरू केली. गाई गुरे चारणे, वनविहार करणे, शेती काम करणे, पोहणे आणि चिंतन करणे, ‘मुलांचे पाय, पाळण्यात दिसतात.’ याप्रमाणे त्यांनी ज्यांना सद्गुरू म्हणून मानले त्या परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू लहानुजी महाराज लिलामृत ग्रंथात संत शंकर महाराजांचे जीवन कार्याचे वर्णन महाराष्ट्राचे संतचरित्रकार पूज्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर यांनी लिलामृत अध्याय १४ मध्ये वर्णन केले आहे. ‘शकंर रमे राना, वनात ! शाळेत कमी जातसे !2! बारा वर्षीचे वयात! टाकरखेडी ओढ उपजत! प्रथम दर्शनी समर्पित! झाला गुरूपदी !३!त्याक्षणी गुरूराया!बोलले भाषाही या!श्भुवयात लेका डोया! चार वर्ष !!४! हा जिज्ञासू शकंर!करी त्याचा विचार! पुढे चार वर्षांनंतर! अक्कल येईल आपणा !५! शंकर नावासम भोळा!त्याला लागलासे लळा! बघाया वर्धा तिरीचा डोळा ! अवकळा मिटाया !६! अशा प्रकारच्या तीस ते पंचवीस ओवीचे वर्णन परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू लहानुजी महाराज कृपाप्रासादित महाराष्ट्राचे संत चरित्रकार श्री बेलूरकर महाराज यांनी केले आहे. आतापर्यंत लिलामृत ग्रंथाचे लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी पारायणे केली आहे.

                       एकदाची गोष्ट प्रथमतःच संत शकंर महाराज सद्गुरू लहानुजी महाराजांच्या दर्शनासाठी जंगलातून पायवाटेने जायला निघाले. तर पायवाटेवर शंकर महाराजांना दोन लांडगे दिसले. महाराज! थोडावेळ थबकले. सद्गुरूचे स्मरण केले तर काही वेळानंतर एक गुराखी आला आणि लांडगे जायला लागले. त्या बालवयात दर्शनासाठी जाण्याची आंस दर्शनाची शंकर बाबांना लागली होती. रात्रभर टाकरखेडा येथे मुक्काम ठोकला दुसरें दिवशी समर्थाचें निवांत दर्शन घेतले. ‘जेव्हा तुझे दर्शन घडे! उघडती विशाल ज्ञानाची कवाडे! मग मी-तू पणाचे पोवाडे! कोठले तेथे !! – ग्रामगीता, या माऊली वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या वचनाप्रमाणे’ रात्र, बेरात्र न पाही! मनात येई तेंव्हा जाई! निघाले एकटेच पायी! गुरू दर्शनासी!! – लिलामृत !१७! अशावेळी श्रीसंत शंकर महाराज यांना सद्गुरूनीं उपदेश केला. त्यादिवसापासून संत शकंर महाराजांनी फळ, कंद, मुळें खावून बारा वर्षे काढली. त्यांनंतर गुरूप्रसाद प्राप्त झाला. तरीपण उपवास करणे सोडले नाही.
                       मग ‘एके दिनी शंकराला ! हर्षभरे प्रसाद दिला!’ म्हणे मोठा व्यापारी आला! ने लेका पाहिजे ते! बाबा म्हणे साधकाने! नित्याभ्यास करणे! आपण आपणासीं पाहणे! विसरू नये!! सद्गुरूचां प्रभाव! लोकांना येई अनुभव! पुजू लागले रंक राव! लहानू कृपेला!!’ संतकृपा झाली, इमारत फळा आली!’ पिपंळखुटा पासून पाच सात किलोमीटर अंतरावर असलेले मंगरूळ दस्तगीर समर्थांचे जन्मगाव आज सद्गुरू लहानुजी महाराजांना समाधीस्त होवून ५४ वर्ष पूर्ण झाली. त्यांचे जन्मघर तसेच पडून होते. ते राहते घर आणि आजुबाजुचा परिसरातील जागा उपलब्ध करून श्रीसंत शंकर महाराजांनी समर्थांच्या जन्मभूमीचां कायापालट केला. तसेच त्यांचा जयंती व पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. एवढचं नाहीतर सद्गुरू लहानुजी महाराजांच्या समाधीनंतर पूणे, तिर्थक्षेत्र पंढरपूर, भंडारा, नागपूर, अमरावती इत्यादी ठिकाणी परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू लहानुजी महाराज मुर्ती स्थापना होत आहे.

                        संताचे बाबतीत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत संत स्वरूप व संत चमत्कार बाबतीत विविध प्रकार आहेत. विदेही संत, अवलिया संत, परमहंस स्थितीला पोहचलेले अधिकारी संत, प्रज्ञाचक्षू संत, बाल पिशाच्च अवस्थेचे संत अशा प्रकारचे विविध संत महाराष्ट्राच्या संत भूमीत होवून गेले. त्यापैकी परमहंस श्रीसमर्थ सद्गुरू लहानुजी महाराज हे आत्मज्ञानी संत होऊन गेले. त्यांना भूत, भविष्य व वर्तमान काळाची जाणीव त्यांना होती. सदैव भिंतीकडे पाहायचे, आणि भक्तांच्या मनातील भाव ओळखून सांगायचे. तशाच प्रकारे संत शंकर महाराज हे मातृह्दंयी संत आजही शेंकडों संत विभूती तसेच कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार संत मंडळी म्हणून संबोधल्या जाते. परंतू जी संत वृत्तीची जी अवस्था आहे. माझ्या मते काही संतांना जवळून पाहण्याचा व संत दर्शनाचा योग मला या पन्नास वर्षांत आला. त्यामध्ये संत शकंर महाराज हे मातृह्दयी संत पूज्य साने गुरुजी प्रमाणे चष्मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं! त्यास उज्वल ठेवी तिचे वर्णन! स्त्रिच्या तेजावरी पुरूषांचे मोठेपण! ऐसें आहे!! -ग्रामगीता.
                        संत शंकर महाराजांचे हृदय हे आईच्या म्हणजेच माऊलींच्या हृदय याप्रमाणे कधींही त्यांच्या चेहऱ्यांवर दुसऱ्याविषयी राग, व्देष, इर्षा  किंवा क्रोधाची भावना दिसली नाही, किवां रागावतांना शिवी देतांना, कधीच पाहिले नाही. ‘संत ओळखावा वृत्तीवरूनी!’ असे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत सांगितले. परंतू महाराष्ट्राला एक परंपरा लाभली आहे. जीवंतपणी या देशात संत, महापुरुषांच्या विचारांकडे लक्ष दिल्या जात नाहीत. त्यांच्या सेवा कार्याची दखल घेतली जात नाही. हे वैशिष्ट्य आहे. आज श्रीसंत शंकर महाराज संस्थान, पिपंळखुटा आश्रमाचे वतीने अनाथ, निराश्रीत, अपंग विद्यार्थ्यांना तिथे मोफत शिक्षण दिले जात आहे, तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अंतर्गत महाविद्यालयांचे व्दारा प्रात्यक्षिकरित्या शेती प्रशिक्षणाच्या माध्यमातून आजच्या तरूण पिढीला शेतीचे व्यवस्थापन आणि संवर्धन या संदर्भात शिक्षण दिल्या जाते.

                         विदयार्थी वर्गाची निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. येणाऱ्या दानातून व शेती उत्पादनातून बांधकामाकरीता उपयोग केला जातो.तसेच गौशाळा, गोपालन, गौरक्षण व जनता जनार्दनाच्या सेवेसाठी रूग्णालय निर्माण करून आरोग्य सेवा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच उद्याचे आधारस्तंभ शेंकडों विद्यार्थी सामुदायिक प्रार्थना व ध्यान तसेच वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार व प्रबोधनकारांचे आध्यात्मिक प्रशिक्षण देऊन नवीन पिढी घडविण्याचे महान सेवा कार्य वंदनीय महाराजांचे कृपेने घडत आहेत. आज या ५४ वर्षात मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून अमरावती, पूणे, मुंबई, नागपूर, भंडारा तसेच विदर्भातील भक्त मंडळी संत सेवा करित आहे.
                         परमहंस श्रीसंत शंकर महाराज यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

0
0

Leave a Reply

Realted News