अपात्र शिक्षक नियुक्तीला मान्यता दिल्याचा आरोप : नागपूर पोलिसांची कारवाई
काटा वृत्तसेवा
नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूर विभागाच्या माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना अटक करण्यात आली आहे. जामदार यांनीही बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता दिली असा आरोप आहे.
जामदार यांना यापूर्वी अनेकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र दरवेळी वेगवेगळी कारणे देऊन त्या गैरहजर राहिल्या होत्या. अटकेत असलेले शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यापूर्वी त्या नागपूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक होत्या. एका तक्रारीवरून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली होती.












Users Today : 2
Users Yesterday : 11