सनशाईन स्कूलमध्ये ‘सनशाईन टॉक्स 1’ -प्रेरणादायी सत्राचे यशस्वी आयोजन
का टा वृत्तसेवा : परमानंद मुदगल
कारंजा (घा.) : सनशाईन स्कूलच्या वतीने ‘सनशाईन टॉक्स 1’ या प्रेरणादायी सत्राचे आयोजन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची दिशा व जीवनमूल्यांचा बोध देणारे हे व्यासपीठ कल्पनांना उजाळा देणारे आणि अनुभवांना प्रेरणेत रूपांतरित करणारे ठरले.
या विशेष सत्रासाठी मान्यवर पाहुण्या म्हणून केतकी दीदी, असिस्टंट मॅनेजर – आयटीसी, बेंगळुरू व व्हीएनआयटी, नागपूर (बी.टेक – केमिकल इंजिनीअरिंग) यांच्या माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या कॉर्पोरेट जगातील प्रेरणादायी प्रवासाची कहाणी प्रभावीपणे मांडली.
त्यांच्या संवादातून विद्यार्थ्यांना — करिअर घडविण्याची योग्य दिशा, नवी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा, आत्मविश्वासाने पुढे जाण्याची उर्मी, आणि शिस्तीचे महत्त्व या सर्व बाबींवर मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष प्रेम महिले, सचिव विजय ठाकरे, पर्यवेक्षक पवन ठाकरे व अकॅडेमीक हेड हेमंत बन्नगरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात डायरेक्टर्स, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग लाभला.
केतकी दीदींच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा संचारली. कार्यक्रमाच्या शेवटी सनशाईन स्कूलतर्फे पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. शाळेच्या वतीने सांगण्यात आले की, “सनशाईन टॉक्स या व्यासपीठावर पुढेही अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना आमंत्रित करण्यात येईल, जे उद्याचे नेते घडविण्यास हातभार लावतील.”











Users Today : 3
Users Yesterday : 11