अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या
कळमेश्वर शहर अध्यक्षपदी नम्रता लंगडे
कळमेश्वर : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कळमेश्वर शहर अध्यक्षपदी नम्रता अंकुश लंगडे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार समीर भुजबळ यांनी नम्रता लंगडे यांची नियुक्ती केली आहे.
याप्रसंगी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींना अनेक आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या इतर मागासवर्गीय समुदायासाठी, न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, एकजुटीने लढण्यासाठी तसेच सामाजिक हितासाठी युवक, महिलांसह सर्वांनी तत्पर राहण्याचे आवाहन खासदार समीर भुजबळ यांनी केले आहे.
नम्रता लंगडे यांच्या नियुक्तीबद्दल सुरेश लंगडे, राहुल अंजनकर, मनीष भोगे, संजय श्रीखंडे, राजेश बोरकर, राजूभाऊ भराडे, राजूभाऊ आगलावे, प्रदीप कटारमल, विलास बारामासे, गुड्डू पठाण, प्रवीण श्रीभाते, सतीश भराडे, रामेश्वर कामडी, केशव गणोरकर, रवींद्र खंडार, हितेश भोगे, संजय भोगे, मनोज रोडे, गायत्री आढाव, दुर्गा बोरकर, सुनिता लंगडे, दिपाली लंगडे, सुनिता उभाड, रंजना लंगडे इ. ओबीसी महिला आणि बांधवांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.
