सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व श्रीसंत सखुमाता यांची सदिच्छा भेट
नागपूर I २३ सप्टेंबर : अश्विन शु. २ (द्वितीया) मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व नारा (कारंजा घाटगे) येथील श्रीसंत सखुमाता यांची सदिच्छा भेट महाल येथील संघ मुख्यालयात झाली. ३० वर्षात प्रथमच नवरात्री दरम्यान श्रीसंत सखुमाता देवस्थानातून बाहेर आल्या आणि प. पू. सरसंघचालकांनी आपल्या प्रवासातून खास वेळ काढून त्यांची सदिच्छा भेट घेतली.
श्री संत सखुमाता देवस्थान नारा या परिसराचा लोक कल्याणासाठी उपयोग व्हावा, अशी इच्छा व्यक्त करून, परिसराचे लोकार्पण सरसंघचालकांच्या हस्ते व्हावे, अशी विनंती यावेळी श्री संत सखुमाता यांनी केली. परिसरात वर्षभर होत असलेल्या विविध कार्यक्रमांची, उपक्रमांची व लोकोत्सवांची माहिती देवस्थानाच्या कार्यकर्त्यांनी करून दिली.
भेटी दरम्यान सद्भाव विभागातर्फे मा. अतुलजी घनोटे यांनी व देवस्थानाकडून मनीषा कुलकर्णी यांनी परिचय करुन दिला. यानंतर सद्भाव गतिविधीतर्फे सदस्यांचा परिचय व त्यांचे वेगवेगळ्या भागातील कार्य या बद्दलची माहिती दिली गेली. ज्येष्ठ प्रचारक श्रीकांत देशपांडे (सद्भाव विदर्भ प्रांत पालक), प्रशांत इंदूरकर व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.











Users Today : 1
Users Yesterday : 11