प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन.
सावनेर: जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन उद्या शुक्रवार ११ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॉप जवळ, सावनेर येथे करण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम तथा सत्कार समारंभ, मानवतावादी विचाराचा महासंग्राम, राष्ट्रीय दुय्यम गंमतीचा जंगी सामना, प्रबोधनकार वैभव सांस्कृतिक कला मंडळ शाहीर निनाद बागडे व संच तुर्रा निशान नागपूर, राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान, शाहीर मा. पुरुषोत्तम खांडेकर मु. परसाड ता. कामठी जि. नागपूर यांचा महापुरूषाच्या विचारधारेवर खडा जंगी दुय्यम तमाशा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. निलकंठजी यावलकर, संचालक, मेडीकल कॉलेज (पी.डी.एमसी) अमरावती हे असुन कार्यक्रमाचे उद्घाटक मा. प्रकाशजी गजभिये, माजी आमदार वि..प..नागपूर तर प्रमुख पाहुणे म्हणुन डि.व्ही. गवई, संस्थापक ज.स.अ.भ्र.नि. समिती महा. प्रा. डॉ. अभिविलास नखाते, उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, सावनेर, विजयजी मुसनवार, वाहतुक शाखा हेटी, सुरेश डोंगरे, राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन मुक्ती आंदोलन, उत्तमजी बलवीर, विस्तार अधिकारी प.स. सावनेर, अलंकारजी टेभुर्णे, कंन्द्रीय कार्यध्यक्ष वि.शाहीर कलाकार परिषद, मयुर नागदवने, अध्यक्ष भारतीय परिवर्तनवादी संघ, प्रा. संदिपराव भोंगाडे (अध्यक्ष रूद्रा महिला. पतसंस्था, सावनेर), सुहासिनी सहस्त्रबुध्दे प्रभारी पो. नि. वाहतुक शाखा हेटी, शैलेशजी निकम, गव्हर्णमेंट कॉन्ट्रक्टर, नागपूर, उमेशजी गणोरकर, सामाजिक कार्यकर्ता, पंकज घाटोडे, संचालक कामाक्षी सेलीब्रेशन हॉल, सावनेर आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक भगवान चांदेकर, अध्यक्ष जनकल्याण सामाजिक संस्था महा. यांनी केले आहे.