February 7, 2026 7:22 am

११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन “२१ जून” ला

‘‘कळमेश्वरात आंतरराष्ट्रीय योग दिवस ना. गडकरी यांच्या उपस्थितीत’’

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे,
कळमेश्वर : या वर्षीचा ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन वैश्विक संकल्पनेनुसार ना. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, परिवहन महामार्ग, भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी (सकाळी ०५ ते ०७ वा.) छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड कळमेश्वर येथे साजरा करण्यात येत आहे. यावेळी आ. डाॅ. आशिष देशमुख व डाॅ. राजीव पोतदार तसेच विवीध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थीत राहणार आहे.
                      तरी कळमेश्वर शहर व परिसरातील नागरिकांसाठी, विशेषतः स्त्री-पुरुष, शेतकरी, कामगार, कष्टकरी बांधव, विद्यार्थी, तसेच आबालवृद्धांनी या योग दिन कार्यक्रमासाठी कुटुंबासह आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन कळमेश्वर भाजपा कार्यालयाकडून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केले आहे.

टिप:  योग साधकांनी शक्यतो योगाच्या ड्रेस मध्ये यावे (टी-शर्ट, लोवर, बंगाली, पायजमा, सलवार, कुर्ता). योग साधकांनी येतांना शक्य असल्यास सतरंजी आणावी व वेळेवर उपस्थित राहावे. महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था राहील.


0
0

Leave a Reply

Realted News