एकनाथ शिंदेंवरील वादग्रस्त गाण्यानंतर कुणाल कामरा फरार,
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरावर (Kunal Kamra) राजकीय वादंग उभा राहिला आहे. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर कामरा मुंबईहून फरार झाल्याचं वृत्त समोर आलं असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.
शिंदेंवर टीका आणि शिवसैनिक भडकले, कुणालच्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी घुसून तोडफोड
कुणाल कामरा याने आपल्या स्टँडअप शोमध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित एक विडंबनात्मक गाणं सादर केलं. यामध्ये “शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली, एनसीपी एनसीपीमधून बाहेर पडली” अशी ओळ आणि “ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, आंख पर चष्मा… मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये” असे गाण्याचे बोल होते.
कुणालच्या ‘कॉमेडी’चे विधानसभेत पडसाद
कुणाल कामराच्या कॉमेडीचे विधानसभेतही पडसाद उमटले. शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नारेबाजी करत कुणाल कामराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर स्टँडअप कॉमेडी करणाचा सर्वांना अधिकार. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. या प्रकरणी त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शिवाय या प्रकरणी कुणाल कामरावर कठोरात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंचे कुणाल कामराला समर्थन
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. कुणाल कामरा हा सत्यच बोलला. त्याने जनभावना मांडली. जे चोरी करतात ते गद्दारच असतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. काल कॉमेडी शोच्या सेटची जी तोडफोड करण्यात आली, ती शिवसैनिकांकडून करण्यात आली नाही. त्याचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. ती तोडफोड गद्दारांनी (शिंदे गट) केली आहे. ज्या लोकांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटचे नुकसान केले, त्या लोकांकडून त्याची नुकसान भरपाई वसूल केली जावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
कुणाल कामराच्या गाण्याचे बोल, ज्यामुळे वाद निर्माण झाला…
ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा हाय !
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए।
मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए
ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी , आंखों ओआ चश्मा हाय।
मंत्री नही है वो दल बदलू हैं और कहा क्या जाए, जिस थाली में खाये उसमें ही वो छेद कर जाए
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए।
तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे
ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा हाय !
जरी शिंदेंचं नाव थेट घेतलं नसलं तरी रोख स्पष्ट होता, त्यामुळे शिवसैनिक भडकले. यानंतर ‘द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेल’मध्ये असलेल्या कुणालच्या स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी घुसून तोडफोड केली. यासोबतच शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवर सकाळी 11 वाजता कामराला चोपण्याची धमकीही दिली. तसेच संतप्त कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आणि पोलिसांनी खार व एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
कुणाल कामराच्या स्टुडिओच्या तोडफोडीचे फोटो…