जि.प.च्या १८ हजार शाळा बंद होणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली सभागृहात माहिती
वृत्तसंस्था I का टा वृत्तसेवा
मुंबई : महाराष्ट्रातील १८ हजार जिल्हा परिषद शाळा बंद होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेमध्ये दिली. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या २० पेक्षाकमी असल्याने राज्य सरकारकडून हा निर्णय घेतला जात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
राज्यात २०२५-२६चा शैक्षणिक वर्ष सुरू झाला आहे. दरम्यान या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. अनेक जिल्ह्यातील शाळांमध्ये पटसंख्या वीस पेक्षा कमी झाली आहे. यामुळे कमी पटसंख्या असलेल्या शाळा आता बंद केले जाणार आहे.
याबाबत राज्य सरकारकडून पावसाळी अधिवेशनात माहिती देण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील १८ हजार शाळांमध्ये विद्याथ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. राज्यात जिल्हा परिषदच्या एकूण १ लाख ८ हजार शाळा आहेत. त्यापैकी १८ हजार शाळांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याची नोंद करण्यात आली आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जाणार आहेत.