मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना
आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी; जरांगेंचेही स्वत:च्या सहीने पोलिसांना हमीपत्र जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते. …