दादी प्रकाशमणी यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त ‘विश्वबंधुत्व दिवस’
५७ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
कमलेश्वर, २५ ऑगस्ट: ब्रह्माकुमारी संस्था संचलित ‘विश्वबंधुत्व दिवस’ निमित्त दादी प्रकाशमणी यांच्या १८ व्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात भव्य रक्तदान महाअभियान आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत कमलेश्वर सेवाकेंद्रावर २५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात ५७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे, मुख्याधिकारी नगर परिषद आकाश सुरडकर, उप कार्यकारी अभियंता, रोशन शेंद्रे व सामाजिक कार्यकर्ता मंगेश गमे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
चिकित्सकांच्या मते, रक्तदानामुळे शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच, एक युनिट रक्तामुळे ३ ते ४ रुग्णांचे प्राण वाचू शकतात. सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी यशोदा दीदी यांनी कार्यक्रमाचे सेचालन केले. कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर भाई-बहिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून सर्वत्र कार्यक्रमाची प्रषंसा होत आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान या संकल्पनेला उजाळा देत, या उपक्रमाने मानवसेवेचा प्रभावी संदेश दिला.











