सरकारचे शिष्टमंडळ बच्चू कडूंच्या भेटीला : कर्जमाफीवर अद्याप तोडगा नाही
उद्या मुख्यमंत्र्यांशी बैठक ठरली “निर्णय झाला नाही तर रेल्वेवर चढू” असा कडूंचा इशारा नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांचे आंदोलन आजही सुरू असून नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर शेकडो शेतकरी ठिय्या देऊन बसले आहेत. याच आंदोलनस्थळी आज संध्याकाळी सुमारे आठच्या सुमारास मंत्री पंकज भोयर यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे शिष्टमंडळ भेटीस आले. …