सिम दुसऱ्याला दिल्यास ₹50 लाखांपर्यंत दंड? 3 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद
बनावट कागदपत्रे, सिमचा गैरवापर आणि IMEI क्रमांकातील छेडछाडीवर कारवाई; संचार साथी पोर्टलवर अनोळखी मोबाइल क्रमांक तपासण्याचे आवाहन नवी दिल्ली : तुमच्या नावावर घेतलेले सिमकार्ड दुसऱ्या व्यक्तीला विकणे, भाड्याने देणे किंवा त्याचा गैरवापर होऊ देणे महागात पडू शकते. दूरसंचार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड मिळवणे, त्यांची विक्री करणे किंवा मोबाइलच्या IMEI क्रमांकात छेडछाड करण्यासारख्या कृत्यांसाठी…