गोंडेगावच्या पुनर्वसन आंदोलनावर पोलिसांची मध्यरात्री कारवाई; ग्रामपंचायत सदस्यासह ९ आंदोलक ताब्यात
२० वर्षांपासून प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न; मंडप हटवून पोलिस बंदोबस्तात वेकोलिची माती वाहतूक पुन्हा सुरू का टा वृत्तसेवा I किशोर वासाडे कन्हान : पारशिवनी तहसील अंतर्गत कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने गोंडेगाव येथे सुमारे २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. गुरुवारी रात्री सुमारे २ वाजता पोलिसांनी आमरण उपोषणस्थळावरून ग्रामपंचायत…