प्रताप माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा
कळमेश्वर: आज ता.२३ जून शाळेचा नवीन शैक्षणिक वर्षानिमित्ताने पहिला दिवसाचा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अत्यंत हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला.
प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिक्षक व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव व कुंकुम तीलक करून स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना विवीध शालोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेच्या परिसरातील पहिला दिवसाचा प्रवेश मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावळी ग्रा. पं. सरपंच प्रवीण राऊत, समाजसेवक बाळूभाऊ जाचक, सुरेखा मोहनकर, शितल मोहनकर, रमेश मोहनकर, प्रताप शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्षा, शीलाताई सुके, प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीणकुमार श्रीखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आली. तसेच शालेय पोषण आहारा अंतर्गत पुलाव, जिलेबी ची मेजवानी विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी सरपंच प्रवीण राऊत, बाळूभाऊ जाचक व मुख्याध्यापक श्रीखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेश कार्यक्रमाचे संचालन जयश्री सुके यांनी तर आभार प्रदर्शन ओमदेवी ठाकरे यांनी केले. शाळेचे शिक्षक पृथ्वी चव्हाण व सागर देशमुख यांनी विशेष सहकार्य करत शालेचा संपूर्ण परिसर परिसर शोभिवंत केला होता. अशा प्रकारे शाळेतल्या पहिला दिवस मोठ्या हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने विद्याार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.