रस्ते दुरुस्ती आणि सुविधांची सुधारणा करा : ‘प्रहार’ तर्फे प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन
का टा वृत्तसेवा I
कळमेश्वर : कोंढाळी ते वाडी या मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था, खड्यांचे साम्राज्य आणि बंद पडलेले पथदिवे यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीवर प्रहारचे नागपूर जिल्हा सचिव रजनीकांत अतकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नागपूर कार्यालयात निवेदन देत तातडीने उपाययोजना तसेच सुविधांची सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
कोंढाळी ते वाडी मार्गावरील सध्याचे बस स्टैंड तातडीने दुरुस्त करावेत, ज्या गावांमध्ये बस स्टैंड नाहीत, तेथे नवे बस स्टैंड उभारावेत, रस्त्यांच्या मधील झाडे तोडून मार्ग मोकळा करावा, मुख्य रस्ता व सर्व्हिस रोडवरील खड्डे तातडीने भरावेत, १४ मैल येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. या सर्व मागण्या ६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा प्रहार संघटनेतर्फे प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदन देताना देवेंद्र बोकडे, रॉकी जिभे, मयूर अतकरी, हिमांशू तागडे, देवा अतकरी आदी उपस्थित होते.
![]()
![]()