2022 मध्ये पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची सुचना
मतदार नोंदणीसाठी पदवीधरांना आवाहन
(Nagpur Graduates’ Constituency of Maharashtra Legislative Council)
नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ

का टा वृत्तसेवा I
कळमेश्वर : आगामी नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु झाले असून पात्र पदवीधरांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन कळमेश्वर पदनिर्देशीत निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही अर्हता दिनांक (Qualifying Date) ठरवण्यात आली आहे. यानुसार तीन वर्षांपूर्वी किंवा त्यापूर्वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेले नागरिक या मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क प्राप्त करू शकतात.
नोंदणीसाठी आवश्यक असलेला फाॅर्म-१८ ऑनलाइन किंवा संबधित तहसील कार्यालय, कळमेश्वर/ जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे उपलब्ध असून, त्यासोबत पदवी प्रमाणपत्राची प्रत, ओळखपत्र व राहण्याचा पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
महत्वाच्या तारखा : नोंदणी सुरू: ३० सप्टेंबर २०२५
दावे-हरकती सादर करण्याची शेवटची तारीख : ६ नोव्हेंबर २०२५
मसुदा मतदार यादी प्रकाशन : २५ नोव्हेंबर २०२५
अंतिम मतदार यादी प्रकाशन : ३० डिसेंबर २०२५
२०२० मध्ये या मतदारसंघात सुमारे दोन लाखांहून अधिक मतदारांची नोंदणी झाली होती. यावर्षी ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे निवडणूक विभागाचे म्हणणे आहे.
कळमेश्वर तालुक्यातील विशेषतः ग्रामिण भागातील सर्व पात्र पदवीधरांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी व आपला मतदारसंघ अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करून आगामी निवडणुकीत सहभाग घ्यावा, असे आवाहन कळमेश्वर पदनिर्देशीत निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विकास बिक्कड यांनी केले आहे.
नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कळमेश्वर तालुक्यात दोन मतदान केंद्र, अनुक्रमे 1. तहसील कार्यालय, कळमेश्वर व दुसरे नगर परिषद कार्यालय, मोहपा येथे असणार आहे. पदवीधरांना मतदार यादीत ऑनलाईन नोंदणी करता येते. ऑनलाईन नोंदणी साठी Link : https://mahaelection.gov.in/ असून याशिवाय पदवीधर मतदार यादीत नोंदणीसाठी अधिक माहिती व मदतीसाठी निवडणूक लिपीक श्री. बिलाल खान, तहसील कार्यालय, कळमेश्वर यांचेशी संपर्क साधावा.














Users Today : 2
Users Yesterday : 11