February 7, 2026 4:27 pm

मेहुण्याने जावयाच्या घरी मारला १५ लाखांवर डल्ला

नागपूर : मेहुण्याने जावयाकडे चोरी करून १५ लाखांवर डल्ला मारला. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्रनगरमधील अंजली अपार्टमेंट येथे घडली.

                         याप्रकरणी पोलिसांनी ज्योतिर्मय ऊर्फ पिंटू जखमोला (वय ५४, रा. कोटद्वारे, जि. पौरी गडवाल, उत्तराखंड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. राम अशोक जोशी (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जोशी हे वकील आहेत. त्यांचा मेहुणा ज्योतिर्मय हा नळ फिटिंगचे कंत्राट घेतो. तो नागपुरातच त्यांच्यासोबत राहते. जोशी यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. यासाठी त्यांच्याकडे अशिलाने शिल्लक असलेले एकूण १८ लाख रुपये जमा केले. ही रक्कम त्यांनी ड्रॉवरमध्ये ठेवली.

                         ३ मार्चला ज्योतिर्मय हा बसने इंदूरला गेला. तेथून तो उत्तरखंडला गेला. दरम्यान, ४ मार्चला जोशी यांच्या पत्नी रजनी यांनी ड्रॉवर तपासला. त्यामध्ये केवळ तीन लाख रुपये होते. रजनी यांनी जोशी यांच्या मोबाइलवर संपर्क साधून माहिती दिली. जोशी यांनी ज्योतिर्मयच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी ज्योतिर्मयच्या मित्रांशी संपर्क साधला. ज्योतिर्मयच्या बॅगमध्ये भरपूर पैसे होते. एका मित्राला त्याने दोन लाख तर अन्य एका मित्राच्या मुलाच्या बँक त्यात ५० हजार रुपये जमा केल्याचे त्यांना कळाले. ५० हजार रुपये त्याने मित्राकडून परतही घेतले. ज्योतिर्मय यानेच पैसे चोरी केल्याची जोशी यांची खात्री पटली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

0
0

Leave a Reply

Realted News