♦ राज्यात विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा,
♦ मुंबईत आयआयसीटी उभारणार- फडणवीस
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले की, आयआयटी जशी आहे तशी आयआयसीटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली आयआयसीटी मुंबईत तयार होणार आहे. गोरगाव फिल्मसिटी येथील जागा निश्चित केली आहे.
नागपूर विमानतळाच्या कामाला सुद्धा गती देण्यात आली असून, त्यात केंद्र सरकारसंदर्भातील काही विषयांबाबत सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चर्चा केली. यामुळे विमानतळ कामातील अडसर आता लवकरच दूर होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
गडचिरोलीला ‘माईनिंग हब’ म्हणून विकसित करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे. यादृष्टीने गडचिरोलीला ‘माईनिंग हब’ म्हणून विकसित करण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे. स्थानिक स्वराज्य संस्थांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी लवकरात लवकर मिळावा, असाही एक विषय या चर्चेत होता. या सर्व बाबतीत सकारात्मक प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
केंद्र सरकार त्यावर 400 कोटी खर्च करणार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आयआयटी जशी आहे तशी आयआयसीटी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली आयआयसीटी मुंबईत तयार होणार आहे. आपल्या गोरगाव फिल्मसिटी येथील जागा निश्चित केली आहे. केंद्र सरकार त्यावर 400 कोटी खर्च करत आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातलं टेक्नोलॉजीतल्या सर्व गोष्टी या आयआयसीटीच्या माध्यमातून आपल्याकडे उपलब्ध असतील.
बातम्या आणखी आहेत…