August 15, 2025 11:37 am

नागपूर परिसरात आजही संचार बंदी

नागपूर दंगलीत अनेक पोलिस कर्मचारी जखमी, शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजीही

सावनेर : सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांचा संदेश…

नागपूर : नागपूर मध्ये झालेल्या दंगलीवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये दंगल नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगली दरम्यान करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याने आता या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

                          खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राज्यभर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती. मात्र, ही घटना घडत असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र यातच अंधाराचा फायदा घेत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. नागपूर मध्ये घडलेल्या या घटनेमुळे आता राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या महिला कर्मचाऱ्याला जमावाने शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी देखील केली असल्याची माहिती आता समोर आली आहे.

                    नागपूर मध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक पोलिस कर्मचारी जखमी आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडी नेही वार करण्यात आले. तर या वेळी दगडफेक देखील करण्यात आली. इतकेच नाही तर महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्यामुळे आता या एकंदरीत दंगलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागपूर परिसरात आजही संचार बंदी

                            नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागात आज देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आज शाळा बंद असल्याचा निरोप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे शाळेपर्यंत पोहोचले असल्याचे दिसून आले. अखेर शाळा बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विद्यार्थी आपल्या घरी पोहोचले आहेत. नागपूर परिसरात आजही संचार बंदी लागू असून परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेड्स देखील लावण्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे.

सावनेर : सहायक पोलीस अधिक्षक अनिल मस्के यांचा संदेश…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News