August 15, 2025 11:09 am

RSS मुख्यालयात PM मोदींनी वाहिली हेडगेवार-गोळवलकरांना श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल

संघप्रमुख भागवत अन् सीएम फडणवीस उपस्थित

हिंदू नववर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर अनेक नेत्यांनी स्वागत केले.
                         
                           पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले असून त्यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि गोलवलकर यांना पुष्पांजली वाहिली. 

                           यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी हे आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी येथे येऊन ध्यानधारणा केली होती.

                      यानंतर,  पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली. या कार्यक्रमालासाठी जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराजही उपस्थित होते. तसेच स्वामी गोविंद देव गिरी महाराजही उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे सरकार जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहे. डायलिसिस सेंटर्स खुली आहेत, जिथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध आहेत. आपण देशाला प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ. माधव नेत्रालयाचा विस्तार केला जात आहे. या रुग्णालयात 250 बेड, 14 ओपीडी, 14 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर असणार आहे. या नेत्र चिकित्सालयात आधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

                        २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोदी शेवटचे १६ जुलै २०१३ रोजी संघाच्या मुख्यालयात गेले होते. २०१२ मध्ये संघ प्रमुख के एस सुदर्शन यांच्या निधनानंतरही ते येथे आले होते. पंतप्रधान पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत आहेत. पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत.

                          हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी संघ कार्यालयात होणाऱ्या प्रतिपदा कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहतील. ते कार्यक्रमाला संबोधित देखील करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News