निकाल कोणत्या संकेतस्थळावर व कसा पहायचा?
का टा वृत्तसेवा
पुणे : एचएससी बोर्डाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले की, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेचा निकाल विषयनिहाय गुणांसह 9 विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.
खालील वेबसाइट्सवर निकाल पाहता येतील
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com
निकाल कसा चेक कराल?
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
CISCE ने ICSE, ISC बोर्डाचे निकाल जाहीर केले आहे.
दरम्यान, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. यामध्ये 99.64 टक्के मुले आणि 99.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.