कळमेश्वरातील नगर परिषद माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाची संस्कृती सिंह तालुक्यातून प्रथम

नगर परिषद माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९७.८३%

का टा वृत्तसेवा : चंद्रकांत श्रीखंडे
कळमेश्वर : आज एच एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात कळमेश्वर तालुक्यातील कळमेश्वर येथील पीएमश्री न. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थिनी संस्कृती ओमप्रकाश सिंह हीने सायन्स शाखेतून ९२.८३ टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. संस्कृती ने कुठलीही शिकवणी न लावता नियमित अभ्यास, व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनातून यश प्राप्त केले.

तर शाळेतून द्वितीय आलेला वाणिज्य शाखेचा साहिल गिरधर इंगोले याने ८९.६७टक्के गुण तर तृतीय आलेली प्रेरणा विलास मतलाने हिने ८७.५० टक्के गुण मिळविले. या विद्यालयात एकूण २३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये शाळेची एकूण टक्केवारी ९७.८३ इतकी ठरली.

विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक आणि आईवडील यांना देत शाळेचे आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पौर्णिमा मेश्राम यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर पालिकेचे मुख्याधिकारी आकाश सुरडकर व प्रशासन अधिकारी अर्चना टालाटूले यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले. यावेळी उपमुख्याध्यापक दादाराव जाभुळकर, मनीष निंबाळकर, सुरेखा धरपाल, गणेश तिडके, किशोर धोटे, अरविंद राठोड, कुंदन सूर्यवंशी, मधुकर केंद्रे, प्रीती जवशे, मनीषा ठवळी, ममता गेडाम, रंजना लांजेवार, मनीष हेडाऊ, बाबाराव राठोड आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

0
0

Leave a Reply

Realted News