February 7, 2026 2:38 pm

कळमेश्वरातील जिंदाल विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के

 कळमेश्वरातील जिंदाल विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के

 का टा वृत्तसेवा : चंद्रकांत श्रीखंडे
कळमेश्वर :  येथील जिंदल विद्या मंदिर,ने एसएससी बोर्ड परीक्षेत १००% उत्तीर्ण टक्केवारी मिळवून उत्कृष्ट निकाल मिळविण्याची प्रथा यावर्षीही सुरू ठेवली आहे. एकूण ४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात शाळेतील पहिल्या तीन उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये एकलव्य वाघधरे , हर्षनील वाघधरे, हितांशी बिसेन यांनी बाजी मारली.
                    यांच्या यशाबद्दल जे एस डब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड, कळमेश्वर प्लांट हेड राजेश जैन यांनी मुख्याध्यापिका पल्लवी चक्कीलाला यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट निकालासाठी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे , शिक्षक वृंदांचे व पाल्यांचे अभिनंदन केले.

सीबीएसई बोर्ड निकाल 2024-25

                       जिंदल विद्या मंदिर, कळमेश्वरने सत्र 2024-25 च्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत 100% उत्तीर्ण टक्केवारी मिळवून उत्कृष्ट निकाल दिला आहे. यंदा एकूण 36 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. शाळेतील पहिल्या तीन उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी – 1. मोहित वडे 96.5% 2. शोन माहुरे 94.33% 3. रिया गमे 93.16% मिळवले आहेत.
                       JSW स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड, कळमेश्वरचे प्लांट हेड श्री राजेश जैन यांनी मुख्याध्यापिका सौ. पल्लवी चक्कीलाला यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट निकालासाठी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, शिक्षक वृंदांचे व पाल्यांचे अभिनंदन केले.

0
0

Leave a Reply

Realted News