राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळाकडून उत्पादन शुल्कात वाढ
मुंबई : काही दिवसांपूर्वी देशात बिअरचे दर कमी होतील अशा बातम्यांमुळे मद्यप्रेमींना आनंद झाला होता. मात्र, आता राज्य सरकारने उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून दारूविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचं “सेलिब्रेशन”ही महागणार आहे.
कालच्या कालच्या (दि. 10) मंत्रिमंडळ बैठकीत IMFL (भारतीय बनावटीचे विदेशी मद्य) विक्रीवर कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या शुल्कवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14000 कोटी रुपयांचा महसूल वाढणार आहे.
आता एका क्वार्टरसाठी (180 मिली) 80 ते 360 रुपये मोजावे लागतील…
मद्यपींना आता एका क्वार्टरसाठी (180 मिली) 80 ते 360 रुपये मोजावे लागतील. यामध्ये, देशी दारू 180 मिलीसाठी 80 रुपये असेल, तर विदेशी प्रीमियम ब्रँड 180 मिलीसाठी 360 रुपये मोजावे लागतील.राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्क्याने वाढ करण्यात आली असून, विदेशी मद्यावरही हा कर वाढवण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरणार आहे.
मद्याच्या नवीन किंमती?
♥ देशी मद्य- 80 रुपये (180 मिली)
♥ महाराष्ट्र मेड लिकर – 148 रुपये (180 मिली)
♥ भारतीय बनावटीचे विदेशी मद्य – 205 रुपये (180 मिली)
♥ विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- 360 रुपये (180 मिली)