February 7, 2026 4:06 pm

आमदार डाॅ. आशिष देशमुख यांचा पुढाकार

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व राष्ट्रीय शिक्षण नीतीवर

विशेष बैठकीचे आयोजन 17 जूनला खापा येथे

का टा वृत्तसेवा I मनिष निंबाळकर

नागपूर : ग्रामिण भागातील विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुठेही मागे राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगिण विकासावर महत्त्वाच्या सभेचे  आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेचे आयोजन दि. 17 जूनला दुपारी 3.00 वाजता नगर परिषद कार्यालय, खापा येथे करण्यात आले आहे. तसे आदेश डाॅ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर यांनी आज तातडीने काढले आहेत.
                       आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने व निर्दैशीत या महत्वाच्या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील सावनेर, खापा, कळमेश्वर, मोहपा येथील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी व शिक्षणाधिकारी, सावनेर-कळमेश्वर पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी-गट शिक्षणाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. इटनकर यांनी आदेशात सुचित केले आहे.
                         सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य व सर्वांगिण विकासाच्या हेतूने शिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांचा शारिरिक, मानसिक, बौध्दिक व क्रिडाविषयक विकास, मध्यान्ह भोजनाचा दर्जा, अत्युच्च गणवेश, विद्यार्थ्यांच्या पालकाचे समुपदेशन, सीबीएसई पॅटर्न व राष्ट्रीय शिक्षण नितीवर अंमलबजावणीबाबत महत्वपूर्ण सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी केले आहे.

                        महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासात सीबीएसई पॅटर्न व राष्ट्रीय शिक्षण नितीचे महत्व ओळखून यावर गांभिर्यांने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या तत्पर कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0
0

Leave a Reply

Realted News